‘ या’ तालुक्यातील हजारो नागरीक दोन कुटुंबाच्या वादातून वेठीस..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथे दोन कुटुंबाच्या वादातून देवळाली, गुहा व गणेगाव या तिन्ही गावातील हजारो नागरिकांना वेठीस धरण्याचे कट कारस्थान सुरू आहे. या वादातून वहिवाटीचा एक रस्ता बंद केला तर दुसर्‍या रस्त्याचे काम होऊ देत नाहीत.

सदर दोन्ही रस्त्याचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत यासाठी महसूल प्रशासनाला आज निवेदन देण्यात आले. राहुरी तालूका हद्दीतील नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या गवळीमाळ या ठिकाणाहून गणेगाव गुहा देवळाली गाव च्या काही वस्त्या असून त्या गावाकडे जाण्या येण्यासाठी दोन रस्ते आहेत.

त्यापैकी एक रस्ता नगर मनमाड ते देवळाली शिवारातून गुहा गणेगाव तांभेरे असा रस्ता आहे. हा रस्ता राज्य महामार्गापासून अंदाजे शंभर फूट रस्ता आहे. तो पुढे डांबरीकरण आहे. परंतु शंभर फुटावर रस्ता पाणी साचून खड्डे पडल्यामुळे अत्यंत खराब झालेला आहे.

त्यामुळे नागरिकांना शाळेतील मुले कामगार यांना जाणे येण्यासाठी खूपच हाल होतात तरी सदरचा रस्ता हा लोकवर्गणीतून खड्डे बुजविण्यात तयार आहोत. परंतु जागेच्या वादामुळे त्याठिकाणी मुरूम व खडी टाकू दिली जात नाही. तसेच दुसरा रस्ता त्याला जोडून चिंचविहिरे ते नगर मनमाड हायवे रिंग रोड असून तो पण जागेच्या वादामुळे बंद केलेला आहे.

या दोन्ही रस्त्याबाबत येथील जागा मालकांचे आपापसात वाद आहेत म्हणून चालू असलेल्या रस्त्यावर मुरुम खडी टाकता येत नाही व दुसरा रस्ता लाकडे व दगड टाकून बंद केलेला आहे. हे दोन्ही रस्ते नकाशा वरती असून कायमस्‍वरुपी वहिवाटीच्या आहेत बरेच दिवसापासून त्यापैकी एक अतिमहत्त्वाचा रस्ता बंद आहे.

दुसरा चालू आहे. परंतु जाण्या येण्यासाठी फारच खराब झालेला आहे. सदर दोन्ही रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आठ दिवसानंतर नागरिक स्वतः रस्ता मोकळा व दुरुस्त करतील या वेळी जर वाद निर्माण होऊन

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार प्रशासन राहील असे महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अमोल भनगडे, शरद वाबळे, महेंद्र कोळसे, रामनाथ खांदे, किरण कोळसे, राजेंद्र कडू, संदीप कोबरणे, काकासाहेब कोबरणे, भास्कर कोळसे, सोमनाथ वाबळे, दत्तात्रय वाबळे आदींच्या सह्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!