लाईटची डीपी बसवण्याच्या कारणावरून तिघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-लाईटची डीपी बसवण्याच्या कारणावरून तिघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली असल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे.

याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात उपसरपंचासह एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उपसरपंच वरखडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून राजकीय सूडापोटी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी ज्ञानेश्वर वरखडे व गंगाधर बाळासाहेब वरखडे यांनी निघोज येथील लाईटची डीपी बसवण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर बाळासाहेब लामखडे, राहुल लामखडे, शांताराम लामखडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत ज्ञानेश्वर लामखडे यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेले राहुल लामखडे व शांताराम लामखडे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेचा तपास हवालदार अशोक निकम करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe