टवाळखोर मद्यपीची कापड दुकानावर दगडफेक …! ‘या’ ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- आधीच मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे व्यापारी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

त्यात परत शहरातील व्यापाऱ्यांना टवाळखोर व टारगट गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमक्या देऊन व दादागीरी करुन उधार वस्तू घेऊन परत पैशाची मागणी करणे. या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत.

हे कमी होते म्हणून की काय राहुरी शहरातील नवी पेठेतील गाळ्यांमध्ये असलेल्या प्रसाद नांगरे यांच्या कापड दुकानावर संतोष जगधने याने दगडफेक करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

याबाबत अधिक माहिती अशी, जगधने ह दारु पिऊन आला व नांगरे यांना पैशाची मागणी करू लागला, नांगरे यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने

जगधने याने त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या कापड दुकानावर दगडफेक केली. यात त्यांच्या दुकानासमोर असणाऱ्या मालगाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe