Tips For Bathroom Cleaning : काही वेळा टॉयलेट-बाथरूमचा (Toilet-bathroom) वास इतका येतो की त्याचा पूर्ण घरात दुर्गंध (Stench) पसरतो. घरातील स्वच्छतेचा अभाव (Lack of cleanliness) हे त्याचे एक कारण असू शकते.
आरोग्याच्या (Health) दृष्टीने टॉयलेट-बाथरुम स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. परंतु कित्येकवेळा टॉयलेट-बाथरुम साफ केले तरी त्यातून दुर्गंध येतो.

ही गोष्ट वापरू शकता
तुमचे स्नानगृह-शौचालय खूप अस्वच्छ असेल, काळे डाग असतील, वास येत असेल. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही ॲसिडची (Acid) मदत (Help) घेऊ शकता. ते साफ केल्यानंतर तुमचे बाथरूम-टॉयलेट अगदी नवीन होऊ शकते.
असे मिळू शकते
कोणताही दुकानदार तुम्हाला सहजासहजी ॲसिड देणार नाही. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) घेऊन दुकानात जावे लागेल आणि त्यांना ॲसिड घेण्याचे कारण सांगावे लागेल. बाथरूम-टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी एक लिटर ॲसिड पुरेसे आहे.
- सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या हातात हातमोजे आणि तोंडावर मास्क घालावा लागेल आणि नंतर बाथरूम आणि टॉयलेटमध्ये ॲसिड टाकावे लागेल. आता ते घासून 10-15 मिनिटानंतर ते पाण्याने धुवा आणि तुम्हाला दिसेल की तुमचे बाथरूम-टॉयलेट पूर्णपणे स्वच्छ आहे.
- हातात हातमोजे घालावेत.
- पूर्ण कपडे घाला.
- हातावर किंवा शरीरावर ॲसिड सांडू नका.
- आपल्या हातांनी ॲसिडला स्पर्श करू नका.
- बाथरूम-शौचालयात ॲसिड टाकून बाहेर पडा.