अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. प्रतिभा दीपक दाणे, वय २४ हिला नवरा दीपक याने वेळोवेळी दोन वर्षापासून दारु पिवून शिवीगाळ करणे मारहाण करणे असा त्रास दिला.
३ मार्च २०२१ व ४ मार्च २०२१९ रोजी वाढदिवसासाठी रहाते गावी माहेरी जाण्याच्या कारणातून आरोपी नवरा दीपक दाणे व सासरा प्रभाकर दाणे याने मारहाण करुन शिवीगाळ करुन तिला प्रचंड त्रास दिला व आत्महत्येस प्रवृत्त केले, प्रतिभा दीपक दाणे हिने माहेरी साईनगर तपोवन रोड येथे राहत्या घरी बाथरूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.
याप्रकरणी प्रतिभाचे वडील भानुदास शंकराव कोरडे, रा.चिकलठाण, औरंगाबाद यांच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक प्रभाकर दाणे, वय २८ रा, साईनगर तपोवन रोड, अ. नगर, प्रभाकर रामदास दाणे, रा. अहिल्यादेवीनगर, नेवासा फाटा, नेवासा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेकॉ सुरसे हे करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|