अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- कोरोना संक्रमणाच्या काळात आपले कर्तव्य अथकपणे बजावणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे. काल दुपारनंतर थेट खात्यात पगार जमा झाल्याचे संदेश कर्मचाऱ्यांना प्राप्त झाले.
या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विचारणा करीत जिल्हा कोषागार विभागास सोमवारी निर्देश दिले होते. त्याचा परिणाम म्हणून जिल्हा कोषागार कार्यालयाने काल मंगळवारी तात्काळ कार्यवाही केली.
पगार प्राप्त झाल्याने महसूल सेवकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात महसूलचे सेवक अथकपणे कर्तव्य बजावत आहेत.
या दरम्यान, अनेक कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची बाधा झाली. कौटुंबिक चरितार्थ चालवण्यासाठी वेतन नियमित वेळेत होणे अपेक्षित असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन थकले होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|