पारनेर तहसीलदारांच्या निलंबनासाठी नाशिक येथे विभागीय आयुक्तांच्या कार्यालया समोर धरणे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- चौकशी अहवालातून पारनेर तहसीलदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द होऊन देखील त्यांच्यावर कार्यवाही झालेली नसल्याने, देवरे यांचे तातडीने निलंबन करुन, त्यांची जिल्हा बाहेर बदली करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्तांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात समितीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश वाबळे, पांडूरंग धरम, नाशिक जिल्हाध्यक्षा भावनाताई हागवणे आदी सहभागी झाले होते.

पारनेर तहसीलदार यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी उपोषणानंतर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयास चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बेकायदेशीर कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी 27 जुलै रोजी उपोषण करण्यात आले होते.

उपोषणाची दखल घेऊन नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयास चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. पारनेर तहसीलदारांच्या भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यांनी आत्महत्येची ऑडिओ क्लिप व्हायरल करुन कारवाई पासून बचाव करण्यासाठी शासनाची दिशाभूल केली आहे.

भ्रष्टाचार दाबण्याचे काम त्या करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. पारनेर तहसीलदार देवरे प्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त झाला असताना

यामध्ये दोषी असलेल्या तहसीलदारांचे निलंबन करुन त्यांची जिल्हा बाहेर बदली करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनास विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe