सर्वाधीक लस महाराष्ट्राला मिळत असूनही उठसूट केंद्र सरकारकडे बोट दाखविणे योग्य नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- संकटाच्या काळात राज्य व केंद्र सरकारमध्ये समन्वय, सलोखा राखीत एकत्रीत काम करायला हवे. परंतु प्रत्येक वेळेला आपले अपयश झाकण्यासाठी कुठल्याही गोष्टीत केंद्रावर टीका करण्याचे राजकारण करणे दुर्देवी आहे.

ऑक्सीजनचा साठा तसेच देशात सर्वाधीक लस महाराष्ट्राला मिळत असूनही उठसूट केंद्र सरकारकडे बोट दाखविणे योग्य नाही. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्राने केले,

ते केंद्र सरकारकडून लसी उपलब्ध झाल्या म्हणून केले ना ? असा परखड सवाल उपस्थित करीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टिकाकारांचा समाचार घेतला.

तसेच या संदर्भात केंद्र सरकार आपले कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले. ना.दरेकर काल मंगळवार रोजी नगर जिल्हयासह शहरातील कोरोना सद्यस्थितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला.

कोरोना संक्रमीतांच्या उपचार व्यवस्थेसंबंधी उपलब्ध खाटा, आयसीयू बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनची जिल्हयाची दैनंदिन गरज व उपलब्ध मात्रा, रेमडिसीवीर इंजेक्शन आदीची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून घेतली.

त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी ना.दरेकर यांनी संवाद साधला. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, प्रसाद ढोकरीकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe