आज ३४४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४०६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७२ हजार ९८८ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ३०६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५२ आणि अँटीजेन चाचणीत २३६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०४, जामखेड ०१, नगर ग्रा. ०३, नेवासा ०१, राहता ०१ आणि संगमनेर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०२, जामखेड ०३, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रा.०४, नेवासा ०५, पारनेर २३, पाथर्डी १२, राहता ११, राहुरी १५, संगमनेर २२, शेवगाव १७, श्रीगोंदा १८,

श्रीरामपूर ०९ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २३६ जण बाधित आढळुन आले.

मनपा ०६, अकोले १५, जामखेड २५, कर्जत ३१, कोपरगाव ०१, नगर ग्रा. ०८, नेवासा २९, पारनेर ३१, पाथर्डी २४, राहाता ११, राहुरी १४, संगमनेर ०५, शेवगाव १४, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, अकोले १६, जामखेड १६, कर्जत २१, कोपरगाव ०९, नगर ग्रा. २३, नेवासा १२, पारनेर ५१, पाथर्डी २८, राहता १९, राहुरी २७, संगमनेर १८, शेवगाव २८, श्रीगोंदा ४६, श्रीरामपूर १५ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,७२,९८८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२३०६
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:५९२५
  • एकूण रूग्ण संख्या:२,८१,२१९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

  • घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
  • प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
  • स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
  • अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe