आज ५७१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४२२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  जिल्ह्यात आज ५७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ७०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार २८४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५७ आणि अँटीजेन चाचणीत २२३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०९, जामखेड ०२, कोपरगाव ०१, नगर ग्रा. ०४, पारनेर ०१, संगमनेर ०८, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले ०४, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रा.०३, नेवासा ०६, पारनेर ३२, पाथर्डी ३१, राहाता ०७, राहुरी १७, संगमनेर ११, शेवगाव ०४, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ०४, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २२३ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले २०, जामखेड २४, कर्जत ०४, कोपरगाव १८, नगर ग्रा. ११, नेवासा ०३, पारनेर २०, पाथर्डी २८, राहाता ०७, राहुरी २६, संगमनेर ०६, शेवगाव १३, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले २२, जामखेड १०, कर्जत १६, कोपरगाव ११, नगर ग्रा. २६, नेवासा १२, पारनेर ३९, पाथर्डी ४३, राहता २०५, राहुरी २८, संगमनेर ५४, शेवगाव ३६, श्रीगोंदा ४४, श्रीरामपूर २२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,७०,७०४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२२८४
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:५८६६
  • एकूण रूग्ण संख्या:२,७८,८५४
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe