अहमदनगर जिल्ह्यातील आजची सर्वात वाईट घटना ! लसीकरण सुरु असतानाच गळफास…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश शेळके (वय ४५) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आलीय.

मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून डॉ. गणेश शेळके हे करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

ते बहिरवाडी (ता. नेवासा) येथील रहिवासी होत. मंगळवारी करंजी येथील उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरु होते. त्यावेळी डॉ. शेळके हे तणावाखालीच असल्याचे जाणवत होते.

त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना एक कागद व पेन मागितला व उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करुन घेतला. बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नाही.

म्हणून कर्मचाऱ्यांनी शेळके यांना आवाज दिला. तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला.

अखेरीस दरवाजा तोडून आत पाहिले असता डॉ. शेळके यांनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe