Toyota Rumion : भारतात अजूनही एकत्र कुटुंब पद्धतीत आहे. अशातच एकत्र कुटुंबासाठी मोठी गाडी घेणे फायद्याचे ठरते. तुम्ही देखील तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडी प्रतीक्षा करायला हवी, कारण एक नवीन ७ सीटर कार मार्केटमध्ये येणार आहे. ही उत्तम फीचर्स तसेच उत्कृष्ट मायलेजसह बाजरात एंट्री करणार आहे.
जपानी वाहन निर्माते सुझुकी आणि टोयोटा यांच्या करारानुसार आणखी एक नवीन कार सादर करण्याची तयारी सुरू आहे. आता टोयोटा आपल्या वाहन पोर्टफोलिओमध्ये मारुती सुझुकीच्या एर्टिगावर आधारित नवीन एमपीव्ही टोयोटा र्युमियन लॉन्च करणार आहे. नुकतीच ही कार दक्षिण आफ्रिकेच्या बाजारात सादर करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ऑगस्ट महिन्यात ही कार विक्रीसाठी लॉन्च करू शकते.
टोयोटाची ही नवीन कार मारुती एर्टिगावर आधारित असेल, जरी त्यात काही बदल केले जातील, ज्यामुळे या दोन्ही कार एकमेकांपासून वेगळ्या असतील. किमान बाह्यभागात काही बदल नक्कीच दिसतील. नमूद केल्याप्रमाणे, Rumion काही दिवसांपूर्वी आफ्रिकन बाजारपेठेत सादर करण्यात आले होते.
Toyota Rumion लाँच केल्यानंतर, भारतीय बाजारपेठेत टोयोटाकडून हे चौथे बहुउद्देशीय वाहन (MPV) असेल. आत्तापर्यंत कंपनी इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस आणि वेलफायर सारखी मॉडेल्स विकते. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत ही MPV सादर केली आणि त्याच वेळी ही नेमप्लेट भारतातही ट्रेडमार्क केली. टोयोटाची ही सर्वात स्वस्त एमपीव्ही असेल.
टोयोटा ही कार सीएनजी प्रकारात देखील सादर करेल, कारण टोयोटा आपल्या सीएनजी पोर्टफोलिओचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या ते केवळ पेट्रोल इंजिनसह बाजारात दाखल होणार आहे. आता टोयोटा या कारची किंमत काय ठरवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
मात्र, टोयोटाने या कारच्या लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र सणासुदीच्या मुहूर्तावर ते बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. सुझुकी आणि टोयोटा यांच्या करारानुसार, दोन्ही कंपन्या वाहन प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान एकमेकांसोबत शेअर करतात. परिणामी, दोन्ही ब्रँडने एकमेकांच्या वाहनांवर आधारित अनेक मॉडेल्स सादर केली आहेत. अलीकडेच, मारुती सुझुकीने इनोव्हा हायक्रॉसवर आधारित मारुती इन्व्हिक्टो ही सर्वात महागडी कार म्हणून लॉन्च केली. आता मारुती एर्टिगावर आधारित टोयोटा आपली सर्वात स्वस्त एमपीव्ही रुमिओन लॉन्च करणार आहे.