अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. छोट्या व्यापाऱ्यांंसाठी सरकार काही ना काही पॅकेज जाहीर करेल,
अशी अपेक्षा होती, पण सरकारने निराशा केल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटले आहे. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले.
व्यापाऱ्यांसाठी काहीही सवलती न दिल्याने ते नाराज आहेत. सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर न करता पार्शल लॉकडाऊन जाहीर केला आहे.
यामुळे व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष गांधी यांनी म्हटलंय. ठराविक व्यापार सुरू आणि ठराविक व्यापार बंद यामुळे मूळ उद्देश सफल होईल का याबद्दल आमच्या मनात शंका असल्याचेही ते म्हणाले.
सरकारने व्यापाऱ्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. पुन्हा एकदा व्यापाऱ्याचा विचार करून सरकारने त्यांना दिलासा द्यावा अशी विनंती व्यापारी संघटनांनी केली आहे. रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्यापासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. उद्यापासून १५ दिवस राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मुंबईसाठी आजही दिलासादायक बाब समोर आली आहे. आजही नव्या रूग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|