अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा (Grape Orchard) आपणास बघायला मिळतात.
पश्चिम महाराष्ट्र द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. सध्या याच पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची (Grape Growers) व्यथा काळीज पिळवटणारी आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या हंगामात सुरुवातीपासून निसर्गाच्या अवकृपेचा (Climate Change) सामना केला आहे. हंगामाच्या सुरुवातीला आलेल्या नैसर्गिक संकटावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी यशस्वी मात केली आणि मोठ्या जिद्दीने व शर्तीने आपल्या सोन्यासारख्या द्राक्षबागा अंतिम टप्प्यापर्यंत आणून ठेवल्या.
मात्र, द्राक्ष बागा अंतिम टप्प्यात असताना सांगली जिल्ह्यात (Sangli District) झालेल्या अवकाळी पावसामुळे (Untimely Rain) द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून द्राक्ष तडकत आहेत. यामुळे द्राक्ष बागा (Grape Orchards) क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मात्र यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक भुर्दंड सहन करावे लागणार आहे.
या अवकाळी पावसाचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. हे संकट कमी होते की काय म्हणून द्राक्ष तडकण्याच्या भीतीने आता व्यापाऱ्यांनीही द्राक्षे खरेदी थांबवल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर असलेली संकटाची मालिका आता द्राक्ष काढणीसाठी तयार असताना देखील बघायला मिळत आहे.
असे सांगितले जाते की, कुठल्याही शेतमालाच्या उत्पादनात घट झाली तर त्या शेतमालाचे बाजार भाव विक्रमी वाढतात. पण, द्राक्षाच्या बाबतीत अशी परिस्थिती काही बघायला मिळत नाही. कारण द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट असतानाही द्राक्ष काढणी सुरू झाली आणि द्राक्षाचे दर खाली पडले.
आता हळूहळू तापमानात वाढ होऊ लागली आहे यामुळे द्राक्षाच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळण्याअगोदरच अवकाळी पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यात अजून अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष वावरातच आहे. या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका तासगाव तालुक्याला बसल्याचे सांगितले जात आहे.
या अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या उत्पादनात सरळ परिणाम होणार आहे. ज्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे द्राक्ष काढणे पूर्ण झाले आहे त्या शेतकऱ्यांना या पाण्याचा काही धोका नाही.
मात्र, ज्या द्राक्ष उत्पादक शेतकर्यांचा द्राक्ष अजूनही शेतातच आहे त्यांना या पावसाचा विशेष फटका बसणार आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट घडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
फळबाग जोपासण्यासाठी उत्पादन खर्च अधिक येत असतो, आणि जर द्राक्ष बागा असतील तर मग या उत्पादन खर्चात अधिकच वाढ होते.
द्राक्ष बागा जोपासण्यासाठी या हंगामात शेतकरी बांधवांनी महागड्या औषधांची फवारणी केली. सुरुवातीपासूनच निसर्गाचा लहरीपणा कायम असल्याने शेतकरी बांधवांना अतिरिक्त फवारणी देखील करावी लागली.
यामुळे यंदा नेहमीपेक्षा अधिक उत्पादन खर्च आला असल्याचे बागायतदारांकडून सांगितले गेले. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी हे होते कमी म्हणून आता व्यापाऱ्यांनी द्राक्षाची खरेदी बंद केली.
द्राक्षे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी द्राक्षाला तडे जाण्याच्या भीतीने द्राक्षे खरेदी बंद केली आहे. एकंदरीत व्यापारी सावध पावित्रा उचलत आहेत.
शेतकरी बांधव मात्र व्यापाऱ्यांच्या या धोरणास द्राक्षाचे दर पाडण्याचा कट असल्याचे सांगत आहेत. सध्या तयार झालेल्या परिस्थितीमुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम फक्त उत्पादनात घट होतो असं नसून याचा परिणाम थेट खरेदी वर देखील होऊ शकतो हे समजते.