दुःखद घटना ! भाऊबीजेसाठी आलेल्या विवाहितेचा विहीरीत पडून मृत्यु

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – नगर तालुक्यातील वाळकी येथे भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा विहीरीत मृत्यु झाल्याची घटना घडली. शुभांगी कैलास बाबर ( वय ३१,रा.कानडी बेलगाव ता. कर्जत)

असे विहीरीत पडून मृत्यु झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, विवाहिता आपल्या दोन चिमुरडया मुलांसह भाऊबीजेसाठी आपल्या माहेरी गोवर्धन पिराजी बोठे ( रा. वाळकी ) यांच्या घरी आली होती. सकाळी घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत ती  पडल्याची घटना घडली.

घरच्यांचे लक्ष जाताच तिला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला . मात्र विहीर जुनी असल्याने झाडाझुडपामुळे तिला वाचविण्यात अपयश आले.

नगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने विहिरीतील विवाहितेचा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान मयत महिलेस दोन लहान मुले असून, पती लष्करी सेवेत आसाम येथे कार्यरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe