अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मात्र. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.
त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी दहा वाजता त्यांचं निधन झाले. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.
त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी १०.०० वाजता कोरोनामुळे त्यांचं निधन झाले. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.
राजकीय कारकीर्द एकनाथ गायकवाड यांनी मुंबईतील धारावी भागात काँग्रेस पक्षासाठी मोठे काम केले होते. त्यांनी मुंबई शहर अध्यक्षपदही भूषवले होते. लोकसभा निवडणुकीत एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा पराभव केला होता.
दोन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.
त्यानंतरही ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते. जुलै 2019 मध्ये मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|