अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. रुग्णसंख्या हजारांच्या पार जाऊ लागली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहे.
मात्र अद्यापही अनेकांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे निष्पन्न होत आहे. यावर आता प्रशासनाकडून आक्रमक भूमिका अंगीकारत कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. नुकतेच पारनेर तालुक्यात 43 गावांत दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहे.
त्यानंतर निर्बंधांचे उल्लंघन केल्याने 13 दुकाने करोना कालावधी संपेपर्यंत सील करण्यात आली आहेत. पारनेर तालुक्यात शनिवारपासून 43 गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आलेले आहे. मुख्य बाजारपेठ बंद असल्याने गावांमध्ये शांतता होती. तहसीलदार देवरे यांच्या पथकाने विविध गावांना भेटी देत पाहणी केली.
लॉकडाऊनचे निर्बंध उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील पारनेर 3, भाळवणी 3, टाकळी 2, वासुंदे 2, कान्हूर 2, जामगाव 1 अशी एकूण 13 दुकाने पथकाने करोना कालावधी संपेपर्यंत सील केली. तालुक्यातील इतर ठिकाणी मात्र सर्वत्र कडकडीत बंदचे पालन करण्यात आले होते, असे देवरे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम