परराज्यातून ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी परिवहन मंत्र्यांची ‘आयडीया’!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-  राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचं को-ऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे.

मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे.

म्हणून आम्ही एसटीचे ड्रायव्हर्स ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

पत्रकार परिषद घेऊन मंत्री परब यांनी ही माहिती दिली. आजपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

त्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मदत पॅकेज जाहीर केले आहे.

त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तात्काळ मदतीसाठी राज्य सरकारने मदत सुरू केली आहे, असं ते म्हणाले.

भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमान देण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यपाल आणि सरकारमधला वाद संपला आहे का? असा सवाल करण्यात आला.

त्यावर राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता, असं ते म्हणाले.

तसेच ब्रुक फार्मावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. फार्माच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला यावर काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe