अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेने शहरी गरीब कल्याण योजना सुरू करावी,
अशी मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात आली. फुले ब्रिगेडचे शहर अध्यक्ष दीपक खेडकर, महेश सुडके, आकाश डागवाले, प्रसाद शिंदे, किरण जावळे, गणेश अडब्बले, संकेत लोंढे, आशिष भगत आदी यावेळी उपस्थित होते.
उपचार महागडे असल्या कारणाने त्यावरील खर्च सर्वसामान्य नागरिकांना पेलत नाही. या कोरोना महामारी मध्ये लोक डॉन मुळे नागरिकांच्या हाताला काम नाही या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरी गरीब कल्याण योजना सुरू करुण म्यूकर मायक्रोसिस या आजाराचा या योजनेमध्ये समावेश करावा
आणि या योजनेच्या माध्यमातून एक ते दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून रुग्णांना दिले जावे जेणेकरून रुग्णांची पैसे अभावी होणारी हेळसांड थांबून दिलासा मिळणार असल्याची मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने आयुक्तांना करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम