अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोनाच्या दुसर्या लाटेत निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा.., ऑक्सिजन न मिळाल्याने काही रुग्णांचे गेलेले प्राण…ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यात असे संकट पुन्हा ओढवू नये व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत पोलीस मित्र फोर्स (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.
पृथ्वीवर ऑक्सिजनचा एकमेव स्त्रोत असलेल्या झाडांचे रोपण करुन ती जगविण्याची जबाबदारी उचलून डोंगर परिसर हिरवाईने फुलविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी संघटनेचे चेअरमन प्रा. पंकज राजेद्र लोखंडे, राज्य अध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हा अध्यक्ष शरद महापुरे, मोहनदादा ठोंबे, ऋषीकेश थोरात, प्रशात गांधी, वैभव आव्हाड, सचिन साळवे,
अमित लोखंडे, ऋषीकेश गोपाळघरे, उमेश वाळके, इरफान पठाण, राजू भाकरे, जावेद सय्यद, संजय खडके, पोर्णिमा भाकरे, सायली भाकरे, दिव्या रोकडे, रेबिका भाकरे, ऋतूजा सरोदे आदी उपस्थित होते. प्रा. पंकज लोखंडे म्हणाले की, एक दिवसाचा पर्यावरण दिन साजरा करण्याऐवजी वर्षभर पर्यावरणाप्रती आस्था प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे.
पर्यावरण दिवस वर्षभर साजरा होण्याची गरज आहे. एक दिवसच पर्यावरणाचे महत्त्व व कार्यक्रम नको आहे. या भावनेने पोलीस मित्र फोर्स (महाराष्ट्र राज्य) योगदान देणार आहे. निसर्गात प्रत्येकाचे सुख, समाधान सामावलेले आहे.
कोरोनात ऑक्सिजन नसल्याने अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी व ऑक्सिजनसाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल गायकवाड यांनी जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ,
वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल, निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे. वृक्षरोपण ही लोकचळवळीचा भाग म्हणून पुढे आली पाहिजे. यासाठी सर्वांना योगदान देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम