अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने प्रतिलिटर 100 रुपये दर ओलांडले आहेत. कारने प्रवास करणे खूप महाग झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये काय उपाय करावा या विचहरात सर्व लोक आहेत.
जर आपणही पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त असाल तर आपण सीएनजी कार वापरू शकता. याक्षणी बाजारात सीएनजी साठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी काही ऑप्शन्स आणले आहेत जे तुमची निवड होऊ शकतात.
Maruti Suzuki Alto मारुती सुझुकी अल्टो हा स्वस्त सीएनजी पर्याय आहे. सीएनजी कारमध्ये अल्टोने सर्वाधिक मायलेज दिले आहे. यात आपल्याला 32 किमीपेक्षा जास्त मायलेज मिळेल, या कारची किंमत 2.88 लाख रुपयांपासून सुरू होते.
Maruti Suzuki WagonR यामध्ये मारुती सुझुकी वॅगन आर देखील एक चांगला पर्याय आहे. या कारमध्ये फॅक्टरी फिट सीएनजी किटदेखील उपलब्ध आहे. यात आपल्याला 32 किमी पर्यंतचे मायलेज मिळेल. त्याची किंमत सुमारे 5.25 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Celerio ऑल्टो आणि वॅगनआर व्यतिरिक्त, सेलेरिओ देखील सीएनजीसाठी वाईट निवड नाही. त्याचे मायलेज बरेच चांगले आहे. यात आपल्याला 32 किमी पर्यंतचे मायलेज मिळू शकते. सेलेरिओची किंमत सुमारे 5.37 लाख रुपयांपासून सुरू होते.
Hyundai Santro सीएनजी सेगमेंटमध्ये मारुती व्यतिरिक्त काही ह्युंदाई कारसुद्धा चांगल्या पर्याय आहेत. त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे ह्युंदाई सॅंट्रो. या हॅचबॅकने 30.48 किमीचे मायलेज दिले आहे. ह्युंदाई सॅंट्रोची किंमत 4.58 लाखांपासून सुरू होते आणि 6.26 लाखांपर्यंत जाते.
Hyundai Grand i10 Nios ह्युंदाई सॅंट्रो व्यतिरिक्त आपण सीएनजी सेगमेंटमधे कंपनीच्या ग्रँड आय 10 निओस घरी आणू शकता. ही कार 20.7 किमी / किलो पर्यंत मायलेज देते. या ह्युंदाई कारची किंमत 6.63 लाख रुपये आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम