अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- पती पत्नीच्या झालेल्या वादातून पत्नीने पतीविरूध्द पोलिसात तक्रार दिली. माझ्याविरूध्द तु पोलिसांत तक्रार का दिली असे म्हणत पतीनेच पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी पतीवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, भिंगार येथील वडारवाडी येथे राहणारी महिला रेश्मा सुर्यवंशी हिने पतीसोबत झालेल्या वादातून या महिलेने पतीविरूध्द पोलिसांत तक्रार दिली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/crime-3300089_201908289153.jpg)
सदरची महिला पोलिसांत तक्रार देवून घरी आल्यानंतर पतीने तिच्याशी वाद घालण्यास सुरूवात करून तू माझ्याविरूध्द पोलिसांत तक्रार का दिली.
तुला आता मी जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्याने प्लास्टिकच्या बाटलीत आलेले पेट्रोल पत्नीच्या अंगावर ओतून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी रेश्मा संतोष सुर्यवंशी या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष राजाराम सूर्यवंशी याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोसई बेंडकोळी हे करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|