अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सोया करण्यात आली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा घरी बसून काम करण्याची वेळ आली आहे. मात्र आता घर बसल्या आपल्या करमणुकीसाठी डिश टीव्हीने एक आकर्षक ऑफर घेऊन आली आहे. देशातील सर्वात मोठे डायरेक्ट-टू-होम (DTH) ऑपरेटर डिश टीव्हीने आपल्या वापरकर्त्यांना मोफत सेवा देण्याची घोषणा केली आहे.
कंपनी आपल्या ग्राहकांना ३० दिवसांची विनामूल्य सेवा देणार आहे. ग्राहकांनी कंपनीचा दीर्घकालीन प्लॅन निवडल्यास या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. डिश टीव्हीकडे बर्याच योजना आहेत ज्या दीर्घकालीन वैधतेसह मिळतात.
या योजनांची वैधता ३ महिने, ६ महिने आणि १२ महिन्यांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे डिश टीवीच्या इन लॉन्ग-टर्म प्लॅनचा रिचार्ज करण्यासाठी डीटीएच प्लॅनमध्ये मोफत सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त पैसे भरण्याची गरज नाही.
जाणून घ्या काही आकर्षक ऑफर्स :- जर ग्राहकानं ३ महिन्यांचं रिचार्ज केलं तर कंपनी त्यांना ७ दिवसांची अतिरिक्त सेवा विनामूल्य देईल.
या व्यतिरिक्त जर ग्राहकांनं ६ महिने आणि १२ महिन्यांसाठी रिचार्ज केलं, तर त्यांना अनुक्रमे १५ दिवस आणि ३ दिवसांची सेवा विनामूल्य मिळेल. याशिवाय १२ महिन्यांचं रिचार्ज केल्यास फ्री बॉक्स स्वॅप सुविधादेखील देण्यात येईल.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|