बारा जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका एकाच वेळी होणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  कोरोनामुळे सव्वा ते दीड वर्षे लांबणीवर पडलेल्या राज्यातील मुदत संपलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह १२ जिल्हा मध्यवर्ती बँकांची निवडणूक एकाचवेळी होणार आहे.

त्यासाठी दि. ३ सप्टेंबरपासून मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यक्रम २५ दिवस चालणार असून त्यानंतर दहा दिवसांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

त्यामुळे या १२ बँकांच्या निवडणूकीची रणधुमाळी ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा बँकांसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणूकांना दि. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगिती आहे.

दोनच दिवसापूर्वी शासनाने सहकारी संस्थांमधील केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूकांवरील स्थगिती उठवली. ज्या टप्प्यावर या निवडणुका स्थगित केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!