अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बनावट दारु व वाहतूक करणारे वाहने मिळुन २० लाख ८० हजार ४५५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच या प्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत पथकाने आरोपी दीपक मच्छिद्र निर्मळ ( रा. निर्मळ पिंपरी, ता. राहता),
दीपक भाऊसाहेब पारधी (रा. जांबूत, ता. संगमनेर), किरण शांताराम गुंजाळ (रा. कासार दुमाला, ता. संगमनेर),
राजेंद्र सीताराम रहाणे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) या चार आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
लॉकडाउनच्या पार्शभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने राहुरी तालुक्यातील निर्मळ पिंपरी या ठिकाणी छापा टाकून विदेशी दारुचा मोठ्या प्रमाणावर साठा व दोन आयशर टेम्पो,
एक कार तसेच एक दुचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या कारवाईमध्ये मॅकडोल व्हिस्की, इम्पेरिअल ब्लू, ओसी ब्लू, रॉयल,
ब्लेंडर्स प्राईड, मास्टर ब्लेंड तसेच देशी दारू भिंगरी संत्रा व बॉबी आदी नामांकित कंपन्यांच्या दारुच्या बाटलीचे बनावट बुच्चन मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|