गावठी कट्यासह दोघेजण जेरबंद! अल्पवयीन मुलाचा समावेश!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-अवैधरित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या दोघांना शेवगाव तालुक्यातील कानोशी परीसरात सापळा रचून पोलिसांनी जेरबंद केले.

बाबासाहेब दादाबा बटूळे  (वय-२७) व अल्पवयीन मुलगा (दोघे रा. भारजवाडी ता. पाथर्डी)असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून, त्याच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत केले आहेत.

पो.काँ.भनाजी काळोखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म ऍक्ट गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना खब-यांमार्फत मिळालेल्या माहितीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,

पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह पो.हे.काँ. बी.एस.बडधे, दिलीप राठोड, राजू ढाकणे, भनाजी काळोखे यांनी रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास कोनोशी ता. शेवगाव येथे सापळा लावला.

तेथील कोनोशी नांदुर रस्त्या शेजारील खंडोबामंदीराजवळ एका लिंबाच्या झाडाखाली बाबासाहेब दादाबा बटुळे व एक अल्पवयीन मुलगा बसलेले आढळून आले.

त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टा व काडतुस आढळून आले दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन मुलास बालसुधार गृहात पाठवण्यात आले.

तर बटुळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास बुधवार ता.१० पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पावरा करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe