कोट्याधियांचा घोटाळा घातल्याप्रकरणी व्यंकटेश पतसंस्थेच्या दोघा संचालकांना अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- नेवासा तालुक्यातल्या सोनईच्या व्यंकटेश पतसंस्थेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा घातल्याप्रकरणी दोघा संचालकांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.

या घोटाळ्याप्रकरणी तेजकुमार गुंदेचा आणि गोपाल कडेल या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सदर कारवाई जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी ही धडाकेबाज कारवाई केलीय.

याबाबत अधिक माहिती अशी की, या पतसंस्थेच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी सोनई पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली होती. मात्र दोघांना जामीन मिळाला असून एक जण अद्यापही अटकेत आहे.

व्यंकटेश पतसंस्थेत अनेक ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी जमा असून या पतसंस्थेच्या म्होरक्यांनी लाखो रुपयांच्या या ठेवी हडप करण्याचा प्रयत्न केलाय. जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या महत्वपूर्ण कामगिरीने या पतसंस्थेच्या ठेवीदारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe