अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- लोकप्रतिनिधींबाबत व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपप्रकरणी सध्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या प्रकरणाची चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
महिला आयोगाच्या आदेशानूसार गठीत केलेल्या उपजिल्हाधिकारी यांच्या स्तरावरील चौकशी गुरूवारी पूर्ण झाली आहे. या प्रकरणातील 18 जणांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
मात्र याप्रकरणातील तिघे पारनेर ग्रामीण रुग्णालयातील दोन महिला डॉक्टरांसह तहसीलदार देवरे यांच्या वाहनचालकाने चौकशीला सामोरे जाणे टाळले. पारनेरच्या तहसीलदार देवरे यांची आत्महत्येची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने देवरे यांना होणार्या त्रासाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानूसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत केली होती. या समितीने 18 जणांना चौकशीसाठी बोलावले होते.
यातील 13 लोक मंगळवारी चौकशीला आले होते. तर तक्रारदार स्वत: तहसीलदार देवरे, त्यांचा वाहन चालक बाबा औटी, पोलीस उपनिरिक्षक प्रमोद वाघ, पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. मनिषा उंद्रे आणि श्रध्दा अडसुळ या गैरहजर होत्या.
यातील दोघांनीच गुरूवारी चौकशीला हजेरी लावली. मात्र, दोन डॉक्टरांसह वाहन चालक हे अंतिम संधी दिल्यानंतरही गैरहजार राहिलेले आहेत.
दरम्यान, आता या प्रकरणात 18 पैकी 15 जणांच्या चौकशीच्या आधारे, त्यांनी सादर केलेले पुराव, यानूसार चौकशी समिती आपला अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सादर करणार आहेत. त्यानंतर तो राज्य महिला आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम