अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- रात्रीच्यावेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने रस्त्याने पायी जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेजण जागीच ठार झाले.
ही घटना पारनेर आळकुटी रोडवरील रांधे फट्याजवळ घडली.
संतोष बाबुराव नाईक (वय ४०), शिवाजी नथुराम जाधव (५०) (दोघेही रा.रांधेफाटा ता.पारनेर) अशी त्या दोघंाची नावे आहेत.
या प्रकरणी पारनेर पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|