अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- शाळकरी मुलाचे गळ्यांतील सोने ओरबाडून त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्याला मारहाण करून चारचाकी वाहनातून घाटशिरस मढीमार्गे तिसगावकडे आलेल्या अज्ञात वाहनाने
तिसगावमधील बसस्थानक परिसरातील एका पादचार्यांसह दोन मोटर सायकलस्वार, एका चारचाकी वाहनाला जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दोनजण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/08/acd.jpg)
सावरगाव रस्त्यावर शेतात चाललेल्या चैतन्य दिलीप भगत या सोळा वर्षीय शाळकरी मुलाच्या गळ्यांतील सोने ओरबाडुन त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत, त्याला मारहाण करून पळ काढलेले तीन ज्ञात तरुण चारचाकी वाहनातून पसार झाले.
या घटनेची माहिती सावरगाव-मढी येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी या वाहनाचा शोध सुरू केला. त्यानंतर या वाहनातील तरूण चार चाकी गाडीसह घाटशिरस मार्गे तिसगावकडे आले.
तिसगाव मधील बस स्थानक चौकात या वाहनाने रस्त्याने पायी चाललेले रमेश साहेबराव नरवडे राहणार तिसगाव यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
यानंतर समोरून मोटर सायकल वरून येणारे गंगाधर सूर्यभान बुधवंत बाळू बंन्सी केदार यांना जोराची धडक दिली. यामध्ये बुधवंत राहणार शिरापूर हे गंभीर जखमी झाल्याने मयत झाल्याची माहीती समजली. त्यानंतर प्रा. प्रकाश पंढरीनाथ लवांडे (रा. मांडवे) यांच्या चारचाकी वाहनाला धडक दिली.
यामध्ये लवांडे देखील जखमी झाले. त्यानंतर याच अपघातग्रस्त वाहनाने युसुफ पठाण यांच्या दुकानाला धडक दिल्याने तिथेच बंद पडल्याने या वाहनातील तिघे तरुण घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती समजताच तिसगावसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.सुमारे दीड तास याठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम