नगर-मनमाड मार्गावरील अपघातात दोघे गंभीर जखमी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी कॉलेज परिसरातील हॉटेल साई दर्शन समोर दुचाकीस्वार व सायकलस्वार यांच्यात अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी दोन वाजता घडली आहे.

मंगेश राठोड(रा.चिंचविहिरे) हे आपल्या दुचाकीवरून राहुरीकडे जात असताना सायकल वर असलेले गोरक्षनाथ तारडे(रा.राहुरी फॅक्टरी) यांच्यात जोरदार धडक झाली.

दोघे गँभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेले असताना मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल डोळस, गोरख घाडगे, प्रतीक जाधव व इतर स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून दोघांना उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचारासाठी पाठविले आहे. नगर -मनमाड मार्गावरील हॉटेल साई दर्शन समोर पडलेल्या खड्ड्यात हा अपघात झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe