दोघा चोरटयांनी महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना येणारे अपयश यामुळे नागरिक पोलिसांचा कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहे. कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे.

नुकतेच शेवगाव येथील पाथर्डी रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अलका ज्ञानेश्वर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ठाकरे पुढील तपास करीत आहेत. जिल्ह्यात सध्या रस्तालूट, मंगळसूत्र चोर्‍या, पळवून नेऊन होणारी लूटमार, असे गुन्हे सध्या सुरू आहेत.

त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही पोलिस गस्त सुरु करण्याची गरज निर्माण झाली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe