अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- दोन युवकांनी गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविल्याची घटना नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर व रस्तापूर गावात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा फाटा (मुकिंदपूर) येथील बापू गोरख तुपे (वय 34) या युवकाने आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या पाईपाला दोरीच्या सह्याने गळफास घेवून जिवनयात्रा संपविली.

file photo
तर रस्तापूर (ता.नेवासा) येथील सुरज दत्तात्रय ढवाण, (वय 19) या युवकाने आपल्या राहत्या घराशेजारील शेतात लिबांच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
दरम्यान या दोन्ही वेगवेगळ्या घटनांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शनिशिंगाणापूर व नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार टि.एम माळवे व सुहास गायकवाड हे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम