अजय देवगनच्या तान्हाजी सिनेमाबाबत उदयनराजे भोसले म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- तान्हाजी : द अनसंग वॉरिअर या सिनेमाने पहिल्याच दिवशी लक्षवेधी कमाई केली आहे. आकड्यांमध्ये बोलायचं झाल तर सिनेमाने पहिल्या दिवशी 16 करोड रुपयांची कमाई केली.

एवढंच नव्हे तर या सिनेमांना थोडं राजकीय वलय देखील निर्माण झालं होतं. याचा फायदा आणि फटका दोघांनाही झाला आहे. अजय देवगनच्या समर्थनाकरता भाजपचे अनेक नेते मैदानात उतरले होते.

तानाजी ‘द अनसंग वॉरियर’ देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट महाराष्ट्राची आणि मराठी योद्धयाची वीरता जगासमोर मांडत आहे.

तानाजी चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील फेसबुकद्वारे या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

तसेच आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील अशी अपेक्षा उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.  

वाचा उदयनराजे भोसले यांची फेसबुक पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित “तानाजी द अनसंग वॉरियर” चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला यामध्ये सिनेअभिनेता अजय देवगण यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली व छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास देशासमोर सादर केला याबद्दल प्रथम त्यांचे आभार.

आज आपण जे स्वराज्य पाहतोय या स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे यांच्यासह अनेक शुरवीर मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली व आपल्या प्राणांची आहुती दिली हा इतिहास व पराक्रम देशातील नवतरुणांच्या मनात व काळजात भिंबवणे अत्यावश्यक झाले आहे.

“तानाजी द अनसंग वॉरीयर” या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तसेच यापुढे ही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment