मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या चार दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे जनतेच्या मनात सरकार पडणार की राहणार असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह (MLA) बंडखोरी केली आहे. ते सध्या गुवाहाटी ला आहेत.
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अजूनही भक्कम असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. मात्र अजूनही बंडखोर आमदारांबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

शिवसेनेची कार्यकारिणी बैठक (Executive meeting) मुंबई (Mumbai) मध्ये पार पडली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिल्याचे दिसत आहे. या बैठकीमध्ये ६ ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बेईमानी करण्याऱ्यांवर कारवाईचे सर्व अधिकार असणार आहेत. बेईमानी करणाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुख थेट कारवाई करू शकतात. बंडखोरांवर कारवाईचे थेट आणि सर्व अधिकार ठाकरेंकडे असणार आहे
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मत मागा. आधी नाथ होते आता बाप झाले, अशी टीका देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
कार्यकारणीतील प्रस्ताव
१. शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि राहिल
२. एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा
३. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे
४. मराठी अस्मितेशी कधीच प्रतारणा करणार नाही
५. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केला. यासाठी उद्धव ठाकरेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
६. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार