अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- मनपा स्थायी समितीच्या सभेमध्ये नगरसेवक मनोज कोतकर यांनी शहरातील गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यामुळे शहरामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
तसेच महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. कॉलनी अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
शहरातील पथदिवे बसवण्याचे काम हाती घ्यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी स्थायी समितीच्या सभेमध्ये केली.
कोतकर म्हणाले, मनपाच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीसाठीची निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र ती निविदा प्रक्रिया न्यायप्रविष्ठ झाल्यामुळे शहरातील जनतेला किती दिवस अंधारात रहावे लागेल, हे सांगता येणार नाही.
त्यासाठी न्यायालयामध्ये महापालिकेने सक्षमपणे बाजू मांडून निविदा प्रक्रियेला चालना द्यावी किंवा महापालिकेने स्वतः बंद असलेले पथदिवे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा आंदोलन करू.
सभापती अविनाश घुले, जल अभियंता परिमल निकम व पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांनी बैठकीच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करत आहेत,
याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. केडगावमध्येही गेल्या १२ दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|