दुर्दैवी : अन् ‘त्याचा’ भुकेेने तडफडून झाला मृत्यू!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना आदिनाथनगर परिसरात तिसगाव- शेवगाव रोडवर शेरकर वस्ती शेजारी अज्ञात व्यक्तीचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॅॉकडाऊन करण्यात आले असून केवळ  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे.

त्यामुळे अनेक व्यक्ती भूकबळीलाही बळी पडत आहेत. सोमवारी राञी आठच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती या परीसरात रस्त्याच्याकडेला अन्नावाचून व्याकूळ अवस्थेत पडलेली दिसली.

तेव्हा त्या ठिकाणी परिसरातील काहींनी त्या अज्ञात व्यक्तीस जेवायला दिले. कारण तो व्यक्ती अन्नावाचून भूकेने व्याकूळ झालेला होता.

परंतु आज सकाळी अचानकपणे येथील राहणाऱ्या व्यक्तीनी कारखान्याशेजारील घोडके वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच त्याच्या मृतदेह दिसून आला.

त्या व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नसून तो व्यक्ती कोणत्या गावातील आहे. याचा तपास लागलेला नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe