अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अकोले तालुक्यातील विरगाव येथे 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांचा देखील मृत्यु झाला आहे.
या दुर्दैवी घटनेत यात अश्विनी कृष्णांगर थोरात (वय 16) व कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय 45, दोघे रा. विरगाव, ता. अकोले, जि. अ.नगर) यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आश्विनी ही दुपारी अभ्यास करण्यासाठी शेततळ्यावर गेली होती.
मात्र, या दरम्यान तिचा शेततळ्याच्या कागदाहुन पाय घसरला आणि ती अगदी कोपऱ्यावरच घसरली. तिने शेततळ्याचा कागद धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही म्हणून तीने जोरजोराने आरडायला सुरूवात केली.
आपल्या मुलीचा आवाज येत असल्याचे तिच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी हातातले काम टाकून थेट शेततळ्याकडे धाव घेतली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील मृत्युला सामोरे जावे लागले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|