दुर्दैव: लेकीला वाचवण्यासाठी आईने टाकली विहिरीत उडी अन…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- सरपन गोळा करत असताना विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या आईचा देखील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील कानगुडेवाडी या गावात घडली आहे.

आशा राजु उकिरडे (वय ४२) व उमा राजू उकिरडे (वय १६) वर्ष असे त्या मायलेकिंची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कानगुडे वाडी येथील आशा उकिरडे व उमा उकिरडे या दोघी स्वयंपाकासाठी जळण म्हणून वाळलेले सरपण गोळा करत होत्या.

दरम्यान कानगुडे यांच्या शेतात त्या सरपण गोळा करत असताना त्यांच्या विहिरीजवळ वाळलेल्या लिंबाच्या झाडाची फांदी त्यांना दिसली. ही फांदी तोडण्याचा प्रयत्न करत असताना उमा उकिरडे हीचा तोल जाऊन विहिरीमध्ये पडली.

यावेळी मुलीला वाचवण्यासाठी आई आशा यांनी देखील तिच्या पाठोपाठ पाण्यामध्ये उडी घेतली.

विहिरीत पाणीही भरपूर होते आणि दोघींनाही पोहता येत नसल्यामुळे दोघींचाही बुडून मृत्यू  झाला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe