अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील देशीदारूच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 8 हजार 760 रुपये किंमतीच्या 43 बॉक्स देशीदारूची चोरी केली.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशियात चोरट्यांना पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वडगावपान येथे शौकत जाहागीरदार यांच्या मालकीचे देशीदारूचे दुकान आहे. सदर दुकानात सुरेश गेनराज काशीद हे खाजगी नोकरीस आहेत. काशीद देशीदारू दुकानाच्या दरवाजाला कुलुप लावुन नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन गेले.
दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने देशी दारुचे दुकानाच्या शेडच्या पाठईमागील पत्रा उचकटुन दुकानात प्रवेश करुन एक लाख 8 हजार 760 रुपये किंमतीच्या देशी दारु बॉबी संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या प्रत्येक बॉक्समध्ये 48 बाटल्या असे 43 बॉक्स कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
याप्रकरणी सुरेश गेनराज काशीद यांनी फिर्याद दिली.त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम