आमदार जगताप यांना मंत्रीपद देण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. तर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांना मंत्रीपद देण्याची एकमुखी मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर,

अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, जॉय लोखंडे, वकिल सेलचे अ‍ॅड. योगेश नेमाणे, उध्दव शिंदे, अमोल कांडेकर, गणेश बोरुडे, लहू कराळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले. कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून ते त्यांना औषधौपचार उपलब्ध होण्यापर्यंत त्यांची धडपड सुरु होती.

कोरोना काळात हवालदिल झालेल्या नगरकरांचे मानसिक मनोधैर्य उंचावण्याचे काम केले. संकटकाळात घराच्या दारापर्यंत धाऊन येणारा आमदार नगरकरांना पहावयास मिळाला. तर शहराच्या विकासात्मक वाटचालीत देखील त्यांचे भरीव योगदान सुरु आहे.

राज्य सरकारने त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रीमंडळात स्थान द्यावे, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe