अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील कोपरगाव येथील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश कोपरे यांचे नकुतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले रविवारी (दि.१४) कोपरगाव दौऱ्यावर असल्याची माहिती आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली.

file photo
कोपरगाव येथील स्व. कोपरे हे रिपाइंचे ज्येष्ठ नेते व ना. आठवले यांचे निकटवर्तीय होते. ना. आठवले रविवारी सकाळी ११ वाजता येणार असून
त्यांच्या सोबत जेष्ठ नेते काकासाहेब खांबाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजयराव वाकचोरे, श्रावण वाघमारे, दिपकराव गायकवाड, यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved