नगर शहरातील खड्याला मनपा आयुक्तचे नामकरण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने नगर शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून प्रत्येक नागरिकांना शहरांमध्ये फिरण्यासाठी खड्ड्याचा सामना करावा लागत आहे

त्यामुळे अनेकांचे छोटे-मोठे अपघात होत आहे व नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठी देखील कठीण होत असल्याने

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली व युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे

यांच्या संकल्पनेतून जुनी मनपा कार्यालय येथिल बेग पटांगण समोरील रस्त्यावरील खड्डे यांना मनपा आयुक्त साहेब खड्डा नामकरण करण्यात आले

यावेळी सोशल मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष योगेश दिवाने, युवक काँग्रेसचे योगेश काळे, विशाल कळमकर, आशिष गुंदेजा, प्रमोद अबुज, अक्षय शिंदे, ईश्वर जगताप, अजय मिसळ, महिला काँग्रेसच्या नलिनी गायकवाड, सुनीता बागडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe