अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धी येथे सरपंच पदी डाॅ.धनंजय संपत पोटे तर उपसरपंचपदी अनिल नामदेव मापारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. धनंजय पोटे व अनिल मापारी यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
दरम्यान राळेगणसिद्धी येथे जयसिंग मापारी, लाभेष औटी ,सुरेश पठारे , दत्ता आवारी या सर्वांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गावातील काही तरुणांनी निवडणूक लढवल्याने निवडणूक लागली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत त्या नवीन तरुणांचा पराभव होऊन ९-० अशा फरकाने जयसिंग मापारी लाभेष औटी यांचे मंडळ निवडून आले होते.
आज बुधवार दि.१० फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी धनंजय पोटे व अनिल मापारी यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी उपसरपंच पदी निवड जाहीर करण्यात आली. डाॅ.धनजंय पोटे अण्णा हजारे यांचे फॅमिली डॉक्टर आहेत.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved