अर्बन बँक : ‘त्या’ संचालकांची धरपकड सुरु ;एकजण ताब्यात 

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- येथील नगर अर्बन बँकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी   पोलिसानी आता दोषींची धरपकड सुरु केली आहे. त्यानुसार  पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेच नगर शहरात छापा टाकून बँकेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे.

त्याच सोबत इतर संचालकांचाही शोध सुरू आहे. याबाबत सविस्तर असे की, एका कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या चिंचवड शाखेची २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे  यांनी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार कर्ज उपसमिती सदस्य, बॅंकेचे संचालक मंडळ सदस्यांसह इतर सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, बॅकेचे संचालक मंडळ सदस्य अशी आरोपींची नावे आहेत.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी कर्ज घेणाऱ्या एकास शुक्रवारी अटक केली आहे.

या गुन्ह्यात बँकेचे संचालक मंडळही आरोपी असल्याने त्यांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांचे पथक शनिवारी पहाटेच नगरमध्ये दाखल झाले. बँकेच्या एका संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News