अर्बन बँक फसवणूक: ‘त्या’ तीन डॉक्टरांचा जामीन नामंजूर आता ‘या’ गुन्ह्यात वर्ग करणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- नगर अर्बन बँकेच्या २२ कोटी ९० लाख रूपये कर्ज फसवणूक प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेले डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ.भास्कर सिनारे व डॉ.रवींद्र कवडे यांचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत.

दरम्यान शहर सहकारी बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात या तीन डॉक्टरांचा सहभाग आढळून आल्याने त्यांना या गुन्ह्यात वर्ग करून घेतले जाणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी सांगितले.

नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत घोटाळा झाल्यानंतर याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा करत असताना या तीन डॉक्टरांच्या खात्यामध्ये सहा कोटी चार लाख रूपये वर्ग झाल्याचे समोर आले होते.

यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना नगरमधून अटक केली होती. यानंतर नगर अर्बन बँकेच्या नगर शाखेत झालेल्या कर्ज फसवणूक प्रकरणी या तीनही डॉक्टरांन वर्ग करून घेतले होते. त्यांना न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

शुक्रवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. याच दरम्यान तीनही डॉक्टरांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe