अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-नगर अर्बन बँक ही व्यापार्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेवर रिर्झव्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
शतकोत्तरी परंपरा असलेल्या या बँकेची थकबाकी पाचशे कोटीवर पोहचली आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नसल्याने बँकेवर हि परिस्थिती ओढवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
नगर अर्बन बँक एक नावाजलेला बँक म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अनेक कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी होती.
सध्या बँक थकबाकीमधील वसुलीचा असलेल्या अभावामुळे आर्थिक संकटात सापडली आहे. महेंद्रकुमार रेखी हे प्रशासक असून थकबाकी वसुलीसाठी रिर्झव्ह बँकेचे खास पथक आले होते.
मात्र या पथकाला बँकेचे इतर अधिकारी सहकार्यच करत नाही.त्यामुळे थकबाकी वसुली होत नसल्याचे दाळमंडई व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी केला आहे.
चोपडा यांनी सांगितले. ही बँक वाचवयाची असेल तर पोलिसांत दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रामाणिकपणे चौकशी झाली पाहिजे.
तसेच आर्थिक कुवत कमजोर असलेल्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज तत्कालीन संचालक मंडळाने दिल्याने बँकेवर आज ही वेळ ओढावली आहे.
तत्कालीन संचालक-मालकाच्या चुकामुळे बँकेवर प्रशासक नियुक्त झाला असून अधिकारी दबावात असल्याने त्यांना वसुलीसाठी सहकार्य करत नाही.
त्यामुळे पाचशे कोटी रुपयांची थकबाकी वसुल होत नसल्याचा आरोप चोपडा यांनी केला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|