गॅस वितरण कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-गॅस वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची लसीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच अत्यावश्यक सेवांमधील फ्रंटलाईन वर्करना लसीकरण करणे गरजेचे अाहे.

अत्यावश्यक सेवेमध्ये दुर्लक्षित असलेले परंतु अत्यंत महत्त्वाचे कार्य करणारे सर्व जनतेच्या पोटपाण्याची काळजी करणारे गॅस वितरण कंपनीचे कर्मचारी या काळात दुर्लक्षित आहेत.

महामारीच्या काळात नेवासे तालुक्यातील भारत गॅस यंत्रणा जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडत सेवा देत आहेत.

यादरम्यान त्यांचा दररोज शेकडो नागरिकांशी संपर्क येत असून सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नेवासे शहर व प्रामीण भागातील भारत गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे गरजेचे आहे.

याबाबत येथील रघुजन गॅस सर्व्हिस कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. कोरोना महामारीत सर्व गॅस एजन्सीधारक, ऑफिस स्टाफ, डिलिव्हरी मॅन, कॅशियर, ट्रक ड्रायव्हर, गोडाऊन किपर आदी कर्मचारी यांचा दररोज थेट ग्राहकांशी संपर्क येतो.

त्यामुळे असे कर्मचारी कोरोना प्रसारक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचारी कामावर येण्यास तयार होत नाहीत.

म्हणून कोरोना संसर्गाच्या काळात या सर्वांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करून प्राधान्याने लसीकरण करून द्यावे, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News