भूतकारवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-बालिकाश्रम रोड भुतकरवाडी जिल्हा परिषद शाळा येथे नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन नगरसेविका वंदना विलास ताठे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केली.

भुतकरवाडी जिल्हा परिषद शाळा येथे नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे. सावेडी, शिंदे मळा, ताठे मळा, फुलारी मळा,

धर्माधिकारी मळा, जय अजय आपारमेंट, आराधना कॉलनी, भिंगारदिवे मळा, ताठे नगर, बोरुडे मळा, सुडके मळा, जाधव मळा, बागडे मळा, लेडकर मळा,

महाविर नगर आधी परिसरामध्ये मोठी लोकसंख्या असून महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र सावेडी टीव्ही सेंटर येथे आहे. उपनगर मध्ये एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

काही वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना लांबून यावे लागते तसेच तासंतास रांगेत उभे राहून सुद्धा लस वेळेत मिळत नाही.

त्यामुळे भुतकरवाडी शाळेत मनपाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ.वंदना विलास ताठे यांनी केली आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe