अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-कोरोना लसीकरण केंद्रावर उपजिल्हा रुग्णालयात मोठा सावळागोंधळ सुरू असून वशिला,
राजकीय दबाव व गाव पातळीवरील ओळखीचा फायदा घेत वयाच्या अटीत बसत नसतानाही लसीकरण करून घेणाऱ्या रांगेतील पात्र, गरजू व सर्वसामान्य माणसावर अन्याय होत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात शासकीय लसीकरण केंद्र असून सकाळपासूनच तेथे नंबर लागतात. रांगेत उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही. सर्व गरजू नागरिक एकमेकांना अगदी चिकटून उभे राहतात. दालन क्रमांक पाचमध्ये रुग्ण तपासणी होते.
दालन क्रमांक सहा कोरोना लसीची नोंदणी करावी लागून क्रमांक १६ मध्ये प्रत्यक्ष लस द्यावी लागते. सोमवारी दालन क्रमांक पाचमध्ये अत्यावस्थ रुग्ण बेडवर होता. दाराबाहेर लसीकरणाची रांग लागली होती.
नंबरवरून रेटारेटी गोंधळ वाढत जाऊन नोंदणी करणाऱ्या एका गुरुजीने रांग लावण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या निर्देशानुसार वय वर्षे ४५ पेक्षा कमी वयाच्या नागरिकांना लस देऊ नये.
मात्र येथील केंद्रावर तसा कोणताच नियम पाळला जात नाही, असे सांगून आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड म्हणाले, पात्रता निकषांमध्ये बसत नसतानाही कमी वयाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी लस घेऊन सोशल मीडियावर फोटो वायरल केले.
यामध्ये भाजपचे विशेषता आमदारांचे निकटवर्तीय जास्त आहेत. रॅपिड टेस्टचे किट गावात आणून विशिष्ट रक्कम घेऊन कोविड टेस्ट सर्रास केली जाते. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, तर त्याला खासगी पॅकेजमध्ये डॉक्टरकडून उपचार घेण्यास सांगितले जाते.
या बाधितांची कुठेही नोंद नसते. रॅपिड किट कुठून मिळते, याची सखोल चौकशी झाल्यास रुग्णांना गंडवणारी साखळी उघड होणार आहे, असे आव्हाड म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|